चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : हलकर्णी (ता.चंदगड) येथील अथर्व - दौलत साखर कारखाना येथील कार्यस्थळावर पर्यावरणपूरक व अत्याधुनिक तंत्र प्रणाली असलेल्या 32.4 मेगावॅट को-जन प्रकल्पाचा पायाभरणी व 2025- 26 मधील गाळप हंगामाचा मोळी पूजन कार्यक्रम शनिवार दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार असून चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते तर काटा पुजन सौ. व श्री. विमल मधुकर करडे यांच्या हस्ते तर दौलत विश्वस्त संस्थेचे चेअरमन अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील हे असणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील ( दक्षिण ) सर्वात मोठा असलेल्या प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभास सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद, दौलत वर प्रेम करणारे हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री मानसिंगराव खोराटे, संचालक पृथ्वीराज खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments