चदगड/प्रतिनिधी : चंदगड पोलिसांनी गोवा बनावट दारू घेऊन जाणाऱ्या दहा जणांनाच्या टोळीला पकडले असून त्यांच्याकडून सुमारे 42 लाख 12 हजार 880 रूपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला.हि कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारास तिलारी नगर ते धामणी रोडवरील बादराईवाडी हद्दीत करण्यात आली.
फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल आशुतोष बाबासाहेब शिऊडकर यांनी चंदगड पोलिसांत दिली असून पोलिसांनी त्यांच्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी संगनमत करून गोवा बनावटीच्या दारूचा साठा महाराष्ट्रात विक्रिसाठी आणला होता. या प्रकरणात विजय वसंत झोरे, गणपती मारुती पाटील,धुळो फोडे,संजय पांडूरंग नाईक, दिलीप शिवाजी मयेकर, अजय दत्तू नाईक,सागर नाईक, सुभाष बांदिवडेकर, उमेश आवडत व विजय आवडण या दहा जणांना अटक करण्यात आली.
गोवा बनावटीच्या दारुचा साठा आरोपी महाराष्ट्र शासनाचा कर चुकवून हि वाहतूक करण्यात येत असताना चंदगड पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत दारूच्या बाटल्यासह चार वाहने जप्त करण्यात आली एकुण पकडलेला मुद्देमालाची किंमत सुमारे 42 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.या प्रकरणाचा तपास चंदगडचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील हे करत आहेत. या कारवाईत पोलिस निरीक्षक आशूतोष शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद नाईक व पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या पथकाने केली.

Post a Comment
0 Comments