Type Here to Get Search Results !

उद्या चंदगड येथे लाडक्या बहिणींचा भव्य 'भाऊबीज' सोहळा

 


(भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आ.चित्रा वाघ उपस्थित राहणार)


चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ) : उद्या शुक्रवार दि. २४ ऑक्टोंबर रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी मतदारसंघातील लाडक्या बहिणींसाठी चंदगड येथे भव्य भाऊबीज सोहळा आयोजित केला आहे. या भाऊबीज सोहळ्यासाठी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा  चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती भाजपा कार्यालय ईनाम सावर्डे येथून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

      


शुक्रवार दि २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वा. चंदगड   येथील सेंट स्टीफन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मैदानावर भाऊबीज सणानिमित्त आ.शिवाजी पाटील मतदारसंघातील आपल्या लाडक्या बहिणींना भेटणार असून यावेळी उपस्थित महिलांना भाजपा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित सर्व लाडक्या बहिणींसाठी आ.पाटील यांनी दिवाळी फराळाचे आयोजन देखील केले आहे. या भाऊबीज सोहळ्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघातील माता- भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments