Type Here to Get Search Results !

गणूचीवाडी येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न


चंदगड/प्रतिनिधी : गणूचीवाडी गावात पूर्णत्वास नेलेल्या विविध विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या निमित्ताने अडुकूर ते गणूचीवाडी रस्ता, गणूचीवाडी ते मुगळी रस्ता, गणूचीवाडी ते मरगुबाइ देवस्थान रस्ता या तीन महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण, तसेच नवीन स्मशानभूमीचे बांधकाम आणि नवीन अंगणवाडी इमारत अशा पाच विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.या सर्व कामांसाठी एकूण ₹१ कोटी ६५ लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे.माजी आमदार राजेश पाटील यांनी ग्रामीण भागात सातत्य राखत जनतेच्या कामांना प्राधान्य दिले आहे.


आपल्या भाषणात मा.आमदार राजेश पाटील म्हणाले की, “ग्रामविकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून शासनाच्या योजनांचा निधी योग्य वापर करून प्रत्येक गावात पायाभूत सुविधा उभारणे हेच आमचे ध्येय आहे.विकासाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे हीच खरी जनसेवा आहे.”



या कार्यक्रम प्रसंगी बाजार समितीचे माजी अध्यक्ष अभयदादा देसाई, संचालक दयानंद पाटील,आमरोळी गावचे सरपंच प्रकाश वांईगडे,कवीवर्य अर्जुन जाधव,गावचे सरपंच सागर भादवणकर,उपसरपंच प्रकाश भादवणकर,सुशीला आर्दळकर,रत्ना आर्दळकर, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments