(आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ.शिवाजी पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन)
चंदगड प्रतिनिधी : राज्यामध्ये देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे. एक मोठी बहिण म्हणून मी यापुढेही शिवाजीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. शिवाजी चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी अतिशय तळमळीने काम करतोय, या माझ्या धाकट्या भावाला अशीच साथ द्या. माझा हा भाऊ एक दिवस चंदगडचा कायापालट नक्की करेल असा विश्वास भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा आ.चित्रा वाघ यांनी चंदगड येथे व्यक्त केला.आ.शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील भगिनींसाठी आयोजित केलेल्या 'दिवाळी भाऊबीज' कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी भर पावसात चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील तब्बल १५ हजार महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आ.शिवाजी पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे मानले जात आहेत.
पुढे बोलताना आ.चित्रा वाघ म्हणाल्या, आ.शिवाजी पाटील यांचा मला खुप हेवा वाटतो. मी चंदगडला दुसऱ्यांदा आले परंतु दोन्हीं कार्यक्रमांना महिलांची संख्या प्रचंड राहीली आहे. आज तर मुसळधार पावसातही आपल्या शिवाभाऊची वाट पाहत हजारो महिला थांबल्या होत्या. मतदारसंघातील बहिणींचे असं प्रेम खुप कमी नेत्यांच्या नशिबात असते. आ.शिवाजी पाटील यांनी चंदगड सारख्या ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून चांगले काम केले, कॅन्सरसारख्या आजारांवर मोफत उपचार केले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अनेक कुटुंबांतील रुग्णांना लाभ मिळवून दिला. हे सर्व करत असताना त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नोकरी मेळावे घेतले, आमदार नसतानाही त्यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी १०० कोटींपेक्षा जास्त निधी आणला. आ.पाटील यांच्या या कार्याची दखल घेत चंदगडच्या जनतेने या शेतकरी पूत्राला आमदार केलं. वर्षाची १२ महिने काळजी घेणाऱ्या भावाला तुम्ही ताकद दिली याबद्दल येथील जनतेचे कौतुक केले पाहिजे. आ.शिवाजी पाटील राजकारणी नाही परंतु ते पक्के समाजकारणी आहेत आणि त्यांचा हाच गुण खुप चांगला आहे. त्यांना राजकारण्यांसारखी भाषणं करता येत नाहीत पण काम करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. आ.शिवाजी पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाही खुप विश्वास आहे. आ.पाटील यांनी कोणतेही काम सांगितले तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतातच असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे जेष्ठ नेते भरमुआण्णा पाटील म्हणाले, आ.शिवाजी पाटील यांनी चंदगड मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. चंदगडच्या जनतेचे भाग्य आहे कि आपल्याला असा प्रामाणिकपणे काम करणारा नेता लाभला आहे. भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये आ.शिवाजी पाटील यांच्या पाठीशी सर्व जनतेने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांना ताकद दिली पाहिजे.
यावेळी बोलताना आ.शिवाजी पाटील यांनी सर्व उपस्थित महिलांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पुढे बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरुवारी शक्तिपीठ महामार्ग चंदगडमधून जाण्याची घोषणा केल्याबद्दल समस्त चंदगडवासीयांच्या वतीने त्यांचे आभार मानले. आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील विकास कामांसाठी व चंदगड नगरपंचायतीसाठी कोट्यावधींची कामे मंजूर झाली आहेत त्याचबरोबर येणाऱ्या काळात कितीतरी विकासकामे मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
************************
*गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर यांचा भाजपमध्ये प्रवेश*
नेसरी गावच्या सरपंच सौ.गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आ.चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश आ.शिवाजी पाटील आणि भाजपाला बळ देणारा ठरणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
---------------------------------------------
यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील,शांताराम पाटील(बापू),संतोष तेली,दिपक पाटील,आय.एस.पाटील,शिवांजली शिंगाडे व स्मिता मिठबावकर,ज्योतीताई पाटील,गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर,नामदेव पाटील,जयश्री तेली,जयवंत सुतार,सचिन बल्लाळ,सुरेश सातवणेकर,सुनिल काणेकर,अरुण मोकाशी,विजय पाटील,विशाल बल्लाळ,दिग्विजय देसाई,अनिकेत चराटी,अमेय सबनीस,महिला संयोजिका भारतीताई जाधव,सि.आर.देसाई,अनिल शिवणगेकर,रविंद्र बांदिवडेकर,जयवंतराव चांदेकर,अशोक गडदे,विद्या पाटील,मंगल वाके,सुधा नेसरीकर,राजश्री गावडे,अशोक कदम,प्रकाश सुर्यवंशी,ॲड.विजय कडुकर, आजी/माजी सैनिक, पत्रकार बंधु-भगिनी व मतदारसंघातील हजारो भगिनी उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments