चंदगड/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या ईश्वरपूर येथील निवासस्थानी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या डॉ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान चंदगड विधानसभा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंघाने चर्चा करण्यात आली.यावेळी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीकदादा पाटील उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments