Type Here to Get Search Results !

युवा नेते महेश सलवादे यांचा बहुजन क्रांती सामाजिक संघटनेकडून भव्य सत्कार

 


चंदगड (प्रतिनिधी): वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे अत्यंत विश्वासू, निष्ठावंत आणि समाजनिष्ठ सहकारी युवा नेते महेश सलवादे यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. गुंडूराव कांबळे, संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. भारती गावडे -पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉ. गुंडूराव कांबळे यांनी महेश सलवादे यांच्या कार्याची स्तुती करताना सांगितले की, “गडहिंग्लज विभागात महेश सलवादे यांच्या रूपाने सामाजिक क्षेत्रात एक नवा विचार, नवा जोश आणि नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सलवादे यांच्या कार्यातून समाजातील तरुणांना नवी दिशा मिळत आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि संवेदनशील कार्यामुळे गडहिंग्लजचा सामाजिक विकास अधिक वेगाने होत आहे.” पुढे ते म्हणाले की, “सामाजिक परिवर्तनासाठी जर कोणी खऱ्या अर्थाने झटत असेल, तर ते सलवादे आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जनसेवेच्या परंपरेला त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेले आहे.”


सत्काराला उत्तर देताना महेश सलवादे म्हणाले की, “हा सत्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून समाजाप्रती अधिक जबाबदारी आहे. बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे कार्य समाजहितासाठी आदर्शवत आहे आणि या संघटनेच्या विविध उपक्रमांना माननीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून चंदगड आजरा गडहिंग्लज विभागामध्ये अतिशय स्ट्रॉंग असणाऱ्या या संघटनेला आपली सर्वतोपरी मदत करण्याचा मी शब्द देतो. डॉ. कांबळे सर आणि संघटनेने दिलेला हा सन्मान मी आयुष्यभर विसरणार नाही. समाजहितासाठी आपण सर्वजण एकजुटीने कार्य करूया, हाच माझा वाढदिवसाचा खरा संकल्प आहे.”


यावेळी संघटनेच्या  कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. भारती गावडे -पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महेशदादा सलवादे यांचे सामाजिक कार्य म्हणजे प्रेरणेचा स्त्रोत आहे. त्यांच्या उपक्रमात कोणतीही कायदेशीर अडचण आली, तरी आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहून सर्वतोपरी मदत करू. समाजात न्याय, शिक्षण आणि समानतेचा संदेश देणाऱ्या प्रत्येक तरुणास सलाम.” असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी कांबळे यांनी केले व त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव भोगोलिकर. बहुजन संघटक पी.डी सरवदे, पांडुरंग कांबळे, संदीप व संतोष यादव,कल्लाप्पा कांबळे,सुधीर कांबळे,बबन माने,सरपंच राजेंद्र कांबळे,राजू कांबळे,अनंत कांबळे,लखन कांबळे,सुरेखा बळजकर, सांची कांबळे, जीवन बळजकर, श्रेया बळजकर यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या भव्य सत्कार कार्यक्रमामुळे गडहिंग्लजमधील सामाजिक वातावरणात नवा उत्साह निर्माण झाला असून, युवा शक्तीच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा प्रभावी संदेश दिला गेला.

Post a Comment

0 Comments