नेसरी/प्रतिनिधी : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त नेसरी पोलीस ठाणे यांचे वतीने शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.30 वाजता सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या नेसरी बस स्थानकावरील पुतळ्यापासुन ते प्रतापराव गुजर स्मारक या दरम्यान एकता दौड चे आयोजन केले आहे.तरी सदर एकता दौड मध्ये नेसरी पोलीस ठाणे हद्दीतील जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घ्यावा असे आवाहन नेसरी पोलीस ठाण्याचे स.पो.नी आबा लाला गाढवे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments