(काँग्रेसचा बालेकिल्ला अधिक भक्कम करण्याचा पदाधिकाऱ्यांचा संकल्प)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक गडहिंग्लज येथे उत्साहात पार पडली.संघटनात्मक बळ अधिक मजबूत करून येणाऱ्या निवडणुका एकजुटीने आणि मोठ्या ताकदीने लढविण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.तर काँग्रेसचा बालेकिल्ला अधिक भक्कम करण्याचा संकल्प करत जोमाने लढण्याचे बळ जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी आपल्या मनोगतातून पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जेष्ठ नेते गोपाळराव पाटील, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर,संभाजीराव देसाई,जे. बी. पाटील, विलास पाटील,ऍड.संतोष मळवीकर, राजेंद्र परीट, अभिजीत गुरबे,शिवाजी पाटील,अशोकराव जाधव, नारायण हसबे, शिवाजी तुपट,विलास पाटील,दिलीप चंदगडकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या दिवसेंदिवस चंदगड मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस चंदगडची ताकद वाढत असून पक्षनेतृत्व आम्हाला जो निर्णय देईल त्यावर आम्ही पक्षवाढीला भर देत निवडणुका लढवू असे राष्ट्रीय काँग्रेसच्या चंदगड तालुक्यातील नेत्याकडून सांगण्यात आले.


Post a Comment
0 Comments