चंदगड/प्रतिनिधी : नागणवाडी ( ता. चंदगड) येथील आयुष्मान आरोग्य केंद्र गरोदर महिलांना नॉर्मल प्रसूती साठी एक हक्काचे माहेरघर असल्याचे येथे कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा पोवार व संपूर्ण सहकाऱ्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत या आयुष्मान मंदिरामध्ये गरोदर महिलांची प्रसूती नॉर्मल व पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याने परिसरातील महिलासाठी एक मोठा आधार ठरत आहे. या आरोग्य उपकेंद्रात सोमवारी दाखल झालेल्या महिलेची नॉर्मल प्रसूती करून तिला प्रसूती किट देण्यात आले. तसेच गेल्या सात -आठ महिन्यात अनेक महिलांची मोफत तपासणी देखील करण्यात आली आहे.
या आयुष्मान मंदिराला आपल्या हक्काचे माहेर घर करण्यासाठी डॉ. ऋतुजा पोवार, परिचारिका प्रतिभा पाटील तसेच आशा सेविका वर्षा ढोणूक्षे यांनी परिश्रम घेतले. या सर्वांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बी. डी. सोमजाळ व प्राथमिक आरोग्य केंद्र कानूर खुर्द चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments