चंदगड/प्रतिनिधी : समर्पण युवा मंच उमगाव यांच्याकडून शिवकालीन किल्ले स्पर्धा पार पडल्या.दिवाळी निमित्त सर्व कलाकारांनी सुंदर किल्ले बनविले होते.मुलांचा उत्साह पाहून गावातील तरुण युवकांनी त्यांचे कौतुक केले.
कृष्णा गावडे,प्रसाद गावडे,पराग गावडे,आर्यन गावडे,संकेत गावडे,अनुज गावडे या मुलांनी विविध किल्ले बनविले.यावेळी कार्यक्रमामध्ये प्रथम शिवाजी महाराज मुर्ती पुजन किल्याचे रेबीन कापुन उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती अध्यापक सतोष गावडे,चद्रकांत गावडे,कुष्णा सावंत,उमेश गावडे,ईश्वर गावडे, ज्ञानेश्वर गावडे,सागर गावडे,प्रकाश गावडे,आश्विनी गावडे,प्रणाली गावडे,चद्रकला गावडे,नंदनी गावडे,पुजा गावडे,सुप्रिया गावडे,सुशिला गावडे,लक्ष्मी गावडे,अनुसया गावडे,नीता गावडेसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.हा कार्यक्रम चिरेदेव गल्ली समर्पन युवा मंच यांच्याकडून उत्साहात पार पाडण्यात आला.सर्व किल्ले बनविलेल्या मुलांचा उत्साह व आवड वाढत जावी,त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने त्यांना थोडक्या स्वरूपात आर्थिक बक्षीस देण्यात आले.


Post a Comment
0 Comments