चंदगड/प्रतिनिधी : उमगाव ता. चंदगड येथे हत्ती व रानटी प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान करण्यात आले आहे.काही दिवसातच कापणीला येणाऱ्या भात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गामधून नाराजी पसरली आहे.
टोपा रामा गावडे,गोविंद दत्तू गावडेझळ,गोपाळ दत्तू गावडे,सावित्री शिवाजी गावडे,अर्जुन बारकु रेडकर यासह काही शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.एकंदरीत वनविभाग व शासनाकडून या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अखेर या सर्व घडामोडीवर "हत्तीकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असून नुकसान भरपाई ही आमच्या स्तरावर बाजार भाव नुसार देणार आहोत.शेतकऱ्यांनी संयम राखावा.दररोज हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवणेसाठी हत्ती हाकरा गट ची नियुक्ती केली आहे. "अशी प्रतिक्रिया वन अधिकारी कृष्णा डेळेकर यांनी दिली.


Post a Comment
0 Comments