चंदगड : कला ही प्रत्येक कलावंतांची प्रतिभा शक्ती असते.त्या प्रतिभा शक्तीच्या जोरावर समाजातील विविध कार्यशील कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्त्वाना आपल्या कलेच्या माध्यमातून आकार देण्याचे काम प्रत्येक पोटतिडकीने करत असतो.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे कार्यशील कर्तव्यदक्ष कार्य सम्राट निष्कलंकी अणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या आपल्या आपुलकी,माणुसकीच्या नात्याची नाळ जोडून समाजाच्या हितासाठी विकासासाठी सतत तळमळ धडपड करणारे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचे हुबेहूब आपल्या कलाकृतीतून रेखाचित्र रेखाटून आपल्या लाडक्या नेतृत्वाला,आमदाराला अर्थात राजेश नरसिंगराव पाटील आणि चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते, चंदगडी रत्न दौलत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष, चंदगड तालुका खरेदी विक्री संघाचे निर्माते, नवं महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक तरूणपिढीचया हाताला काम देऊन त्यांच्या घरात प्रकाश उजळणारे, अनेकाचे प्रेरणादायी प्रेरणास्थान, स्फुरली स्थान, आधारस्तंभ, आशास्थान श्रध्दास्थान स्वर्गीय आ.नरसिगराव गुरूनाथ पाटील यांच्या कार्याला कर्तव्याला सलाम करण्याचे काम आपल्या कलाकृतीतून केचेवाडी या गावच्या कन्या कु.अवनी अर्जुन जाधव आणि कु.अनुश्री अर्जुन जाधव यांनी राजेश नरसिंगराव पाटील यांना रेखाचित्र देऊन केले आहे.
या दोन्ही रेखाचित्राला ठाणे येथे भरलेल्या रेखाचित्र प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते.आताही दोन्ही रेखाचित्रे मुंबई येथील प्रसिद्ध जहांगिर आर्ट्स येथे भरणाऱ्या प्रदर्शन स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी लाभली आहे.चांगल्या व्यक्तीमत्वाच्या कार्याला कर्तव्याला सलाम करण्याचे काम अवनी अर्जुन जाधव या मुलीने आपल्या लाडक्या नेतृत्वाला आमदाराला आपल्या कलाकृतीतून सलाम करण्याचे काम केले आहे.एकंदरीत तिच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments