Type Here to Get Search Results !

शक्तिपीठ मार्गामध्ये बदल,शक्तिपीठ मार्ग आता चंदगड मार्गे



“चंदगडमार्गे जाणारा शक्तिपीठ महामार्ग — विकासाचा नवा महामार्ग ठरणार!”


(आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला यश)


चंदगड/प्रतिनिधी : नागपूर ते गोवा जोडणाऱ्या प्रस्तावित *‘शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पा’*ला राज्यभरात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. धाराशिवपर्यंत या प्रकल्पाला कोणताही विरोध नाही, तर पुढील भागातही शेतकऱ्यांचे फारसे आक्षेप नाहीत. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून सरकारने या महामार्गाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कोल्हापूर भेटीदरम्यान विमानतळावर सुमारे ५०० शेतकऱ्यांनी त्यांना भेटून आपल्या सातबारासह स्वाक्षरी केलेले पत्र दिले. “आमच्या गावातूनच शक्तिपीठ महामार्ग जाऊ द्या,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, विरोध करणाऱ्यांच्या सातबारांची पडताळणी करावी, अशी सूचनाही दिली.फडणवीस म्हणाले, “या प्रकल्पाला जो विरोध आहे तो शेतकऱ्यांचा नाही, तो काही राजकीय नेत्यांकडून प्रेरित आहे. प्रत्यक्षात शेतकरी या महामार्गाचे स्वागत करत आहेत.”


दरम्यान, चंदगड तालुक्यातील आमदार शिवाजी पाटील यांनी  मोठया प्रमाणात लोकांचा मोर्चा काढत ‘महामार्ग आमच्या भागातूनच न्यावा’ अशी मागणी सरकारसमोर ठेवली. या मागणीचा विचार करून सरकारने प्रकल्पाचे संरेखन बदलून चंदगडमार्गे नेण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.या नव्या मार्गामुळे केवळ अडथळे कमी होणार नाहीत, तर प्रकल्पाच्या अंमलबजावणीलाही गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही नवीन जोडण्या व पर्यायी मार्गांवरही सरकार विचार करत आहे.


मुख्यमंत्री म्हणाले, “प्रत्येक मोठ्या प्रकल्पाच्या सुरुवातीला काही प्रमाणात विरोध होतोच. पुणे विमानतळ प्रकल्पालाही सुरुवातीला विरोध झाला होता, पण योग्य मोबदला मिळाल्यानंतर ९५ टक्के जमिनी सहमतीने मिळाल्या. शक्तिपीठ महामार्गालाही लवकरच असाच व्यापक पाठिंबा मिळेल.”


Post a Comment

0 Comments