राज्यस्तरीय कला रत्न पुरस्काराचे मानकरी-रोशन कुंभार
चंदगड/प्रतिनिधी : समाजात विविध क्षेत्रात अनेक जण मोलाचं काम करत असतात.कोण सामाजिक, डॉक्टर, शेतकरी,व्यावसायिक असे अनेकजण आपापल्या परीने काम करून सामाज्यात परिवर्तरणाचं काम करत असतात.असाच एक जो,आजरा तालुक्यातील एरंडोळ गावचा युवक.ज्याने कलेचा ध्यास हाती घेतला.नोकरीसाठी मुंबईला गेलेला हा तरुण नाट्यक्षेत्राकडे वळला. 2012 ला 'मळवट 'या नाटकापासून सुरु झालेला प्रवास आज व्यावसायिक नाट्यक्षेत्रापर्यंत येऊन पोहचला.भाऊ कदमच 'शांतेच कार्ट चालू आहे 'पासुन नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर यांच्या 'थेट तुमच्या घरातून 'या नाटकापर्यंत येऊन पोहचला.तिन्ही सांज,कुसुम मनोहर लेले, कापूस कोंड्याची गोष्ट,मेरा पिया घर आया, अलबत्या गलबत्या अश्या नामांकित नाटकांना प्रकाशयोजना करण्याच काम करत त्यात झी नाट्य गौरव सारखा पुरस्कार देखील मिळवला.
छाप, फास, लेडीज फस्ट, शिलेदार स्वराज्याचे, वेलेंटाईन डे सारख्या लघुपटाच लेखन आणि दिग्दर्शन देखील केल.राज्यनाट्य स्पर्धा,युथ फेस्टिवल यांमध्ये नेहमीच सहभाग.सध्या बालनाटयाचा वसा उचलून आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त बाल कलाकार कसे तयार होतील याकडे लक्ष देणारे रोशन कुंभार यांना यांच्या कार्याचा सन्मान व दिलेले योगदान पाहता त्यांना कलारत्न 2025 च्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.वेगळं क्षेत्र निवडून, त्यात काम करत असताना लोकांची नकारात्मक बोलणी ऐकून देखील आपण आपलं काम नेहमीच करत राहिले. ते करत असताना उत्कृष्ट लेखक-दिग्दर्शक, जीवन गौरव पुरस्कार देखील मिळाले.
आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं, त्याच फळ आपल्याला योग्य वेळी मिळतं अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र माझा प्रतिनिधीशी बोलताना दिली.या क्षेत्रात काम करून आपलं नाव/पैसा कमवण्याची संधी सध्याच्या युवक /युवतीनी नक्कीच घेतली पाहिजे. त्यात त्यांना लागणार मार्गदर्शन आपल्याकडून नक्कीच मिळेल असं देखील कुंभार यांनी सांगितलं.सत्यमेव सेवा फाउंडेशन ही एक अशी संस्था आहे जी खरोखर समाज्यातील हिरे ओळखून त्यांचा सन्मान,त्यांना समाज्यासमोर आणण्याचं काम करते. हा पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे आभार कुंभार यांनी मानले.

Post a Comment
0 Comments