चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील साई विद्यालय इब्राहिमपूर येथील विद्यार्थ्यांनी माणुसकीचा हात पुढं केला आहे.लोककलाकार,शाहिर श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाला भेट देत आर्थिक मदत सुपूर्द केली.
तब्ब्ल २७ वर्षानंतर देखील आपल्या मैत्रीची नाळ जपत साई विद्यालय इब्राहिमपूर १०वी च्या १९९७-९८ बॅचने माणुसकी जपत (इब्राहिमपूर,कानडी,गवसे, शिरोली )यां भागातील माजी विद्यार्थ्यांनी आपले मित्र कै.शाहीर श्रीपती कांबळे यांच्या आकास्मित निधनानंतर त्यांची पत्नी आणि दोन अपंग मुले यांना एक मदतीचा हात म्हणून 24500 रुपये रक्कम जमा करून ही रक्कम त्यांच्या कुटुंबाला सुपूर्द केली.कै.श्रीपती कांबळे यांची परिस्थिती हलाखीची असून मोडके घर, दोन अपंग मुलं व निराधार महिला यांनी संसाराचा गाडा चालविणे जोखमीचे झाले आहे. अश्यातच या दानशूर व्यक्तींनी मदत केल्याने या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments