“रक्ताचा नाही, पण सख्खा आणि पक्का भाऊ म्हणजे शिवा भाऊ!” — चित्राताई वाघ यांची मनोगत रंगलेली उपस्थिती
3️⃣ महिलांसाठी रोजगार, शक्तिपीठ महामार्ग व ७ हजार कोटींच्या उद्योग प्रकल्पाची घोषणा-आमदार शिवाजीराव पाटील
चंदगड/प्रतिनिधी -
"ना रक्ताच्या, ना नात्याच्या — पण मनाच्या नात्याने जिवाभावाच्या!"
अशा ओवाळणीच्या भावनेतून चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील लाडक्या बहिणींसाठी आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांच्या वतीने भव्य भाऊबीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात पावसाची रिपरिप सुरू असतानाही हजारो भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या चित्राताई वाघ, महिला प्रदेशाध्यक्षा, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, यांनी उत्साही उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणात शिवाजी भाऊंबद्दल बोलताना सांगितले —
> “रक्ताचा नाही पण सख्खा आणि पक्का भाऊ म्हणजे शिवा भाऊ! देवा भाऊंचा जवळचा सहकारी असलेला शिवाजी पाटील आपल्या लाडक्या बहिणींसाठी खऱ्या अर्थाने कार्यरत आहे. तो फक्त विकास कामे आणत नाही, तर त्या कामांमधून प्रत्येक बहिणीच्या हाताला रोजगार देण्याचे स्वप्न उराशी बाळगतो.”
चित्राताईंनी पुढे सांगितले की, “धनगर वाड्यांवरील बहिणींना शिक्षण आणि सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून तो झटतोय. मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठ्या आजारपणासाठी मदत मिळवून देतोय. भर पावसात भिजत थांबणाऱ्या बहिणींसाठी मी आज ‘जन्म बाईचा बाईचा’ या गीतातून तुमच्या भावाचा गौरव केला, कारण शिवा भाऊ म्हणजे माणुसकीचा मामा आहे.” या कार्यक्रमात आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या भावनिक भाषणातून सांगितले,“मायमाऊलींचं भाग्य मला लाभलं, मी खूप नशीबवान आहे. महिलांसाठी मला अजून खूप काही करायचं आहे. प्रत्येक बचत गट सक्षम करणार, महिलांना रोजगार उपलब्ध करणार. शक्तिपीठ महामार्ग चंदगड मार्गे आणणार. ७ हजार कोटींचा इंडस्ट्रिज उभारून २६०० लोकांच्या हाताला काम देणार.”
ते पुढे म्हणाले, “देवा भाऊ हे माझं दैवत आहे. मला कोणतंही पद नको, देवा भाऊ मुख्यमंत्री झाले हेच माझं स्वप्न होतं. गेल्या आठ महिन्यांत चंदगड शहरासाठी १९३ कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे. एक दिवस पावसात भिजा, पण मी पाच वर्षं झिजेन. बेळगाव–वेगुर्ला हायवे पूर्ण करणार.”
माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील यांनीही मनोगतात म्हटले, “लोकांच्या हाताला काम देऊनच खरी भाऊबीज साजरी करता येते. शिवाजी भाऊंना आमदार केलं तसेच नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भगिनींनी साथ द्यावी.”
या कार्यक्रमात सुरेश सातवणेकर, सुनिल काणेकर, राजश्री लक्ष्मण गावडे, भारती जाधव (महिला प्रमुख) तसेच शिवाभाऊंच्या कन्या स्मिता व शिवाणी यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यवस्थापन आणि उपस्थिती यांमध्ये माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील, ज्योती पाटील, दीपक पाटील, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, सुनिल काणेकर, ऋषीकेश कुट्रे, लक्ष्मण गावडे, विशाल बल्लाळ, राम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष भावकू गुरव, यशवंत सोनार, मायाप्पा पाटील, श्रीकांत नेवगे, अशोक कदम, प्रताप सुर्यवंशी, अमेय सबनीस, ओमकार सुळेभावकर, संतोष तेली, अनिकेत चराटी, जयश्री तेली आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत दिग्विजय देसाई यांनी केले.चित्राताई वाघ यांचे स्वागत शिवाजी पाटील यांनी स्वतः केले, तर आमदार शिवाजी पाटील यांचे स्वागत चंदगड विधानसभा वतीने करण्यात आले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल शिवणगेकर यांनी केले.
पावसाने कार्यक्रमादरम्यान हजेरी लावली तरीही ओवाळणीसाठी आलेल्या भगिनींनी संयम राखत अखेरपर्यंत सभामंडपात आपली उपस्थिती कायम ठेवली.हा भाऊबीज सोहळा शिवा भाऊ आणि चंदगडच्या बहिणींच्या नात्याचा नवा धागा अधिक घट्ट विणणारा ठरला, असा सर्वत्र गौरव व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments