Type Here to Get Search Results !

खन्नेटी गावातील श्री करेवा देवी मंदिरचा कळशारोहण व जीर्णोद्धार सोहळा संपन्न

 


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील खन्नेटी येथील श्री.करेवा देवी मंदिराच्या कळशारोहण व जीर्णोद्धार सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी चंदगड मतदारसंघाचे माजी.आमदार राजेश पाटील यांचे सुपुत्र निखिलदादा राजेश पाटील यांनी उपस्थिती लावून मनोभावे दर्शन घेतले.या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.मंदिराच्या नव्या स्वरूपामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण होते.


युवा नेते निखिल राजेश पाटील यांनी देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले.याप्रसंगी ग्रामस्थ,देवस्थान समिती सदस्य व महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments