महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज/प्रतिनिधी : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे शेती पिक व शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहिर केलेली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांचा समावेश केला असून एकमेव गडहिंग्लज तालुक्याला वगळले आहे.या आपत्तीग्रस्त तालुक्यांमध्ये गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या गडहिंग्लज शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
यावेळी आमदार सतेज पाटील,प्रा.सुनील शिंत्रे,अमर चव्हाण,कॉ. संपत देसाई, विद्याधर गुरबे, बसवराज आचरी, दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, अजित बंदी, अवधूत पाटील, सोमगोंडा आरबोळे, दिनेश कुंभीरकर, गणेश कुरूंदकर आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments