Type Here to Get Search Results !

माजी.आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून सांबरे येथे हायमास्ट दिव्याचे उद्घघाटन


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यात मोठया प्रमाणात विकासगंगा आणणारे व सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणारे माजी आमदार राजेश पाटील यांच्या सततच्या प्रयत्नातून सांबरे गावात हायमास्ट दिव्यांचे उद्घघाटन करण्यात आले.गावातील मुख्य रस्ता तसेच वस्ती भागात नव्या हायमास्ट दिव्यांच्या बसवणीमुळे परिसर उजळला असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी गावातील वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस मोठी मदत होणार आहे.


“सांबरे गाव उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असून गाव विकासाच्या दिशेने आणखी अनेक उपक्रम हाती घेणार असल्याचेही मा.आमदार राजेश पाटील यांनी मनोगतातून सांगितले.यावेळी सरपंच,उपसरपंच,पंचायत सदस्य,ग्रामसेवक, राष्ट्रवादी गटाचे स्थानिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कित्येक वर्षे प्रलंबित असणाऱ्या या कामाला महत्व देत माजी आमदार राजेश पाटील यांनी सांबरे ग्रामस्थांच्या उपस्थित या गावाला रोषणाई आणली.तर राजेश पाटील यांच्या प्रयत्नांने तालुक्यातील कित्येक गावांना हायमास्ट दिवे मंजूर करण्यात आले आहे.याप्रसंगी सांबरे ग्रामस्थांनी माजी.आमदार राजेश पाटील यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments