र. माडखोलकर महाविद्यालयाच्या संगणक विभागाचा उपक्रम
चंदगड (प्रतिनिधी): चंदगड येथील र. माडखोलकर महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या वतीने “नेक्स्ट जनरेशन UI with Angular” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. राजेंद्रकुमार आजरेकर होते.कार्यशाळेचे उद्घाटन प्रास्ताविकातून प्रा. पी. ए. गवस यांनी केले. त्यांनी या कार्यशाळेचे उद्दिष्ट आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सचिन गावडे यांनी मानले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून गडहिंग्लज येथील वन आयटी सोल्युशनचे प्रमुख सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना Angular या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “वेब डेव्हलपमेंट क्षेत्रात Angular हे अत्यंत प्रभावी आणि मागणी असलेले फ्रेमवर्क आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात केल्यास भविष्यात रोजगार व उद्योग या दोन्ही क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.”
अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्रकुमार आजरेकर म्हणाले की,“तंत्रज्ञानाच्या युगात प्रॅक्टिकल ज्ञान आणि सॉफ्ट स्किल्स दोन्ही महत्त्वाचे आहेत. अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाशी जोडतात आणि आत्मनिर्भर बनवतात.”या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment
0 Comments