Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला धक्का-विनायक (अप्पी) पाटील भाजपमध्ये


चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ) : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. चंदगड तालुक्यातील तरुण नेते व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले विनायक उर्फ अप्पी पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईत त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेतली असून, या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळाल्याचे निश्चित झाले आहे.


विनायक पाटील यांचा पक्षप्रवेश शनिवार, १ नोव्हेंबर रोजी मुंबईत उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रवेशानंतर चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद लक्षणीय वाढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.2024 च्या विधानसभा निवडणुकीत अप्पी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून उल्लेखनीय मताधिक्य मिळवले होते. त्यानंतर ते तालुक्यात एक स्वतंत्र जनाधार निर्माण करण्यात यशस्वी ठरले. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला ग्रामीण मतदारसंघात संघटनात्मक बळ मिळणार आहे.


या प्रवेश सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खमलेटी, महागावचे सरपंच प्रशांत शिंदे, श्रीशैल पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.राजकीय जाणकारांच्या मते, आमदार शिवाजी पाटील यांच्या या नव्या “राजकीय खेळी”मुळे चंदगड मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments