मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातून प्रकाशित होणाऱ्या “शिवारबा” दिवाळी अंकाचे प्रकाशन संपादक प्रकाश केसरकर यांच्या वतीने अत्यंत आकर्षक वातावरणात संपन्न झाले असून नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ, दर्जेदार मराठी साहित्य आणि मनाला भुरळ घालणाऱ्या आकर्षक जाहिरातींनी सजलेला यावर्षीचा “शिवारबा” अंक वाचकांच्या मनावर राज्य करणार आहे असे मत जीवन भोसले यांनी मांडले.
प्रकाशन सोहळ्याला मान्यवर समाजसेवक डाॅ. निलेश मानकर, लोकशांती संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, तसेच बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, गडहिंग्लज तालुका सह. पतसंस्थेचे सीईओ संतोष सुतार यांची विशेष उपस्थिती लाभली.यावेळी विलास पाटील यांनी “शिवारबा” या दिवाळी अंकाने गेली नऊ वर्षे सातत्याने जपलेली गुणवत्ता, विषयवैविध्यता आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल समाधान व्यक्त केले.अंकाच्या माध्यमातून ग्रामीण ते शहरी समाजात साहित्य, संस्कृती आणि विचारांची सेतू बांधणी होत असल्याचे मतही डाॅ. निलेश मानकर यांनी व्यक्त केले.
संपादक प्रकाश केसरकर यांनी सांगितले की, “वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, साहित्यिकांचा सहभाग हेच आमच्या या प्रवासाचे खरे बळ आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या काळातही ज्यांनी ज्यांनी या दिवाळी अंकासाठी सहकार्य केले, त्यांचा मनःपूर्वक आभारी असून सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून ‘शिवारबा’चा प्रवास पुढेही अधिक तेजाने उजळत राहील, असा विश्वास संपादकांनी व्यक्त केला. आणि प्रकाशन सोहळ्यास उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment
0 Comments