कोल्हापूर/प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निगवे खालसा जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत परिते पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक कोल्हापूरात घेण्यात आली.
माजी आमदार स्वर्गीय पी. एन. पाटील साहेबांच्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्याला ताकद देण्याची जबाबदारी माझी आहे असा विश्वास देताना येत्या काळात काँग्रेसचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बळकट करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया असे आवाहन काँग्रेस नेते सतेज पाटील केले.
यावेळी ऋतुराज संजय पाटील,गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले,शशिकांत पाटील- चुयेकर, प्रकाश पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, करवीर तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, नगरसेवक प्रवीण केसरकर, एकनाथ पाटील, श्रीपती पाटील, एल. एस. किल्लेदार, एम. आर. पाटील, डी. एस. पाटील, राजेंद्र कारंडे, रघुनाथ चव्हाण, महेश मेटील, विजय पाटील, पांडुरंग पाटील, विनायक पाटील, मयूर पाटील, अशोक आळवेकर यांच्यासह निगवे खालसा जिल्हा परिषद आणि परिते पंचायत समिती मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments