Type Here to Get Search Results !

चुकीच्या प्रथांना आळा घालून महाराष्ट्राला वाचवावे-ब्लॅक पँथर


चंदगड/प्रतिनिधी : महाराष्ट्र ही संत व महामानवांची भूमी आहे. अनेक परंपरा व संस्कृतीचा वारसा महाराष्ट्राने कायम जपला आहे.मात्र सध्याची चालू असलेली राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवत आहे.यासाठी देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात पर्यायाने देशात सुरू असलेल्या चुकीच्या प्रथांना आळा घालून महाराष्ट्राला वाचवावे असे आवाहन ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी निवेदनाद्वारे केले आहे.याबाबतचे निवेदन नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले.



"शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेबांच्या नेतृत्वाला व कर्तृत्वाला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला पुरोगामीत्वाच्या विचारांनी बांधून ठेवले आहे. मात्र सध्या देशात व महाराष्ट्रात सुरू असलेले वातावरण राजकारण,समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्राला पोषक वाटत नाही. महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभली आहे तसेच बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर या महामानांचा जन्म महाराष्ट्रातच झाल्याने त्यांच्या विचारांचा वारसा नेहमीच महाराष्ट्राने जपला आहे.आणि त्यावरच महाराष्ट्राची व देशाची वाटचाल सुरु आहे.मात्र सध्याची राजकीय परिस्थिती महामानांच्या विचारांना छेद देत असून याला वेळीच थांबवले पाहिजे.यासाठी आदरणीय शरद पवार साहेब यांनी पुढाकार घेवून सदरची परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष,संघटनांच्या नेत्यांना एकत्र करून महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेवून महाराष्ट्राला वाचवावे"असेही निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी भेट देताना ब्लॅक पँथरचे संस्थापक सुभाष देसाई,पदाधिकारी व शिस्तमंडळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments