Type Here to Get Search Results !

चंदगड नगरपंचायत हरकतींवर बदल,लवकरच निवडणूकीचं बिगूल वाजणार


चंदगड/ रोहित धुपदाळे : चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.मतदार यादीवर तब्बल 1317 जणांच्या हरकती घेण्यात आल्या होत्या. चंदगड नगरपंचायती साठी एकुण 8 हजार 315 मतदार असणार आहेत.नगरपचायतीच्या हरकतींवर सुनावणी होऊन काही बदल करण्यात आले आहेत.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली हे निर्णय घेण्यात आले. अधिकाधिक हरकतीवर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला आहे.


मतदार यादीमधील मयत मतदारांच्या नावावर मयत असा शिक्का मारण्यात येणार आहे. दुबार नावापुढे दोन स्टाइलची चिन्हे देणार आहेत. निवडणूक आयोगाने नगरपंचायतीच्या निवडणूकीची तयारी सुरू केली आहे.लवकरच निवडणूकीचे बिगूल वाजणार आहे. म्हणूनच मतदार यादीवर हरकती मागवून अंतिम प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.17 प्रभागात ही निवडणूक होणार असून नगराध्यक्षासह 18 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत प्रभाग 7,8 आणि 9 मध्ये प्रत्येकी 423 मतदार नोंदवले गेले आहेत.सर्वाधिक मतदार हे प्रभाग 3 मध्ये 623 असून सर्वात कमी मतदार प्रभाग 11 मध्ये 299 आहेत.

  

 प्रभागांमध्ये नोंदविलेले मतदार पुढील प्रमाणे 

प्रभाग 1-519, प्रभाग 2- 513, प्रभाग 3-626,प्रभाग 4-528, प्रभाग 5-624,प्रभाग 6- 475, प्रभाग 7-423, प्रभाग 8-423, प्रभाग 9- 423, प्रभाग 10-533, प्रभाग 11-299,प्रभाग 12-563, प्रभाग 13-379, प्रभाग 14-472, प्रभाग 15-495, प्रभाग 16-565, प्रभाग 17-453, 

एकुण -8315

Post a Comment

0 Comments