( विनापरवाना झाडतोड व वाहतूक प्रकरणी दोन आरोपींवर वनगुन्हा दाखल)
“अवैध वृक्षतोडीची माहिती द्या — नाव गोपनीय ठेवले जाईल” वन विभागाचे नागरिकांना आवाहन!
चंदगड/प्रतिनिधी : वन विभागाच्या दक्षतेमुळे पुन्हा एकदा अवैध वृक्षतोडीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी वनपरिक्षेत्र चंदगड येथील वनपालांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागणवाडी–वाळकोळी–गंधवगड मार्गावर गस्तीदरम्यान अवैध लाकूड वाहतुकीचा मोठा प्रकार पकडण्यात आला.गस्तीदरम्यान मौजे वाळकोळी फाट्याजवळ MH09 GM 5084 या क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची ट्रॉली यामधून इंजायली इमारती लाकूड नग २३ (एकूण ५.२३८ घनमीटर) विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळले.मोक्यावर चौकशी केली असता चालक तुफेल इकबाल कदीम (रा. डोणेवाडी)आणि लाकूड खरेदीदार अजरुद्दीन रजाक सय्यद (रा. नेसरी) यांनी कोणताही परवाना किंवा पास दाखवू शकले नाहीत.त्यामुळे वन विभागाने तत्काळ कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि लाकूड माल जप्त केला.
ट्रॅक्टर (MH09 GM 5084) — ₹2,00,000/-
विना क्रमांकाची ट्रॉली — ₹50,000/-
लाकूड माल (५.२३८ घ.मी.) — ₹33,643/-
एकूण किंमत : ₹2,83,643/-
सदर प्रकरणी वनरक्षक सागर कोळी यांनी प्र.गु.रि. नं. टी-03/2025 दि. 02/11/2025 असा वनगुन्हा नोंद केला असून, पुढील तपास वनक्षेत्रपाल तु.र. गायकवाड व वनपाल के.एस. डेळेकर करत आहेत.ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक धैयशिल पाटील,सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के.एस. डेळेकर, वनरक्षक सागर कोळी आणि वनसेवक नितीन नाईक, सचिन कांबळे व आकाश गडकरी यांनी संयुक्तरित्या केली.
वन विभागाचे नागरिकांना आवाहन :
“अवैध वृक्षतोड, अवैध शिकार, वाहतूक किंवा अतिक्रमण यासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास
नागरिकांनी जवळच्या वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
अथवा टोल-फ्री क्रमांक 1926 वर कळवावे.
माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.”
चंदगड वन विभागाची ही कारवाई केवळ एक जप्ती नाही —
तर जंगलरक्षणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ठोस कृती आहे.
“वन जपा, जीवन वाचा!” — हाच या कारवाईचा खरा अर्थ!

Post a Comment
0 Comments