Type Here to Get Search Results !

गोमांस वाहतुकीवर चंदगड पोलिसांची धडाकेबाज कारवाई


(साडेतीन लाखांचे मांस व दोन वाहनांसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त)


चंदगड/प्रतिनिधी : तिलारी मार्गावर कोदाळी परिसरात बुधवारी मध्यरात्री चंदगड पोलिसांकडून साडेतीन लाखांचे गोमांस आणि दोन वाहने असा तब्बल २१ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये बेळगाव आणि गोकाक येथील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.


याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब दस्तगीरसाब बागवाले (२५, रा. अंकलगी–गोकाक), सोहेल जमील जमादार (३२), मोहम्मद सफान सलीम नाईकवाडी (३१), अमोल मोहनदास, मोहम्मद बेपारी, मोहम्मद बेपारी आणि हुसेन नदाफ अशी आरोपींची नावे आहेत.एकंदरीत घटनास्थळी एक वाहन बिघडल्याने आरोपी त्यातील गोमांस दुसऱ्या गाडीत भरत होते. या हालचालींवर संशय आल्याने ये–जा करणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यातून ३ लाख ४३ हजारांचे गोमांस आढळून आले.या कारवाईतील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अमोल मोहनदास आणि हुसेन नदाफ हे घटनास्थळावरून पसार झाले.तर या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


चंदगड तालुक्यातून अश्या कारवाईमुळे पुन्हा एकदा बाहेरून गोमांस विक्री वाहतून होत असल्याचे सिद्ध झाले. तर  या कारवाईमुळे हिंदू संघटनेकडून चंदगड पोलिसांचे कौतुक करण्यात आले.


Post a Comment

0 Comments