चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील उमगांव–सावतवाडी धुरीवाडी या परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची वाहतुकीची समस्या अखेर मार्गी लागली आहे. आमदार शिवाजीराव सट्टूपा पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज अत्यंत उत्साहात पार पडला.
या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सेवा उद्योग समितीचे राज्य संयोजक लक्ष्मण विश्राम गावडे (भा.ज.पा.) यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी ग्रामस्थ आणि स्थानिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला.
या कार्यक्रमाला सटूपा पेडणेकर,परशुराम तळकटकर,कृष्णा सावंत,चंद्रकांत गावडे,सोमा गावडे, गंगाराम रेडकर, तानाजी सावंत, एकनाथ धुरी, भागोजी गावडे, पांडुरंग सावंत, शिवाजी सावंत, श्रीकांत बांदेकर, प्रकाश धुरी, ज्ञानेश्वर गावडे, दिगंबर धुरी, औदुंबर देवणे, पांडुरंग रेडकर, तसेच सर्व तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या उपस्थितीने सोहळ्याला उत्सवी रंग चढला. रस्ता मंजूर झाल्याने उमगांव–सावतवाडी–धुरीवाडी परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीची सोय सुधारेल.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी आमदार शिवाजीराव सट्टूपा पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. “या रस्त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments