चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ) : सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची चंदगड तालुक्यात नवी नियुक्ती करण्यात आली असून, अध्यक्षपदी लक्ष्मण विश्राम गावडे (रा. जांबरे) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशान्वये दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.तहसिलदार कार्यालय, चंदगड यांच्यामार्फत संबंधितांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
या समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे-
1)लक्ष्मी संजय जाधव – रा. वरगाव
2)महादेव निंगाप्पा सांबरेकर – रा. माणगाव
3)भरमू तातोबा पाटील – रा. कालकुंद्री
4)वैजनाथ लक्ष्मण हुसेणकर – रा. सरोळी
5)जोतिबा रामचंद्र गोरल – रा. आंबेवाडी
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना असून, निराधार, वृद्ध, विधवा, अपंग व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना मासिक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे दिले जाते. नव्याने नियुक्त झालेल्या समितीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मंजूर होण्यासाठी अधिक पारदर्शक आणि संवेदनशील कार्यपद्धती राबवली जाणार आहे.
अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाचा लाभ पोहोचविण्याचे निर्धार व्यक्त केला आहे. “योजना ही फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात दुर्बल घटकांच्या जीवनात बदल घडवून आणेल, हेच आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामपंचायतींनी या नव्या नियुक्तीचे स्वागत केले असून, “नव्या समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू व्यक्तींना दिलासा मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र माझा 24 परिवाराकडून हार्दिक अभिनंदन!


Post a Comment
0 Comments