Type Here to Get Search Results !

हाजगोळीतील ज्योती गावडे होम मिनिस्टरच्या मानकरी


भरमु शिंदे/चंदगड : दीपावली सणानिमित्त हाजगोळी ता.चंदगड येथे होम मिनिस्टर या कार्यक्रम नुकताच पार पडला.हे आयोजन ग्रामपंचायत हाजगोळी यांच्याहस्ते करण्यात आले.सरपंच शितल विनायक पवार,उपसरपंच दीपक पाटील, सदस्य व्यंकटेश कांगुटकर,तुकाराम शिंदे, विठोबा जाधव, शारदाबाई सुतार,लता पाटील त्याचप्रमाणे उद्योजक विनायक पवार,शिवाजी सुतार, चालोबा शिंदे यांच्या उपस्थित होम मिनिस्टर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला.होम मिनिस्टर कार्यक्रम मनोरंजनात्मक व मजेशीर असल्याने हाजगोळी गावच्या शेकडो महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला व कार्यक्रम पाहण्यासाठी बघ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.विशाल पाटील यांनी सुंदर असे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे निवेदन केले.



कार्यक्रमाच्या शेवटी विजयी झालेल्या स्पर्धकांचे नावे जाहीर करून प्रथम क्रमांकासाठी पैठणी साडी -ज्योती परशुराम गावडे यांना बक्षीस देण्यात आली.तसेच द्वितीय क्रमांक मिक्सर सेट-अर्चना बाबू गावडे यांना देण्यात आले.तृतीय क्रमांक मोठा कुकर-अर्पिता राजेश शिंदे यांना देण्यात आले.चतुर्थ क्रमांक लेमन सेट-अनुराधा दिलीप शिंदे,पाचवा क्रमांक कप सेट-सुनंदा कल्लापा पाटील यांना बक्षीस स्वरूपात देण्यात आले.तर सहभाग घेतलेल्या सर्व महिलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments