चंदगड/रोहित धुपदाळे : छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पीएचडी डिग्री प्रधान कार्यक्रम संपन्न झाला.यामध्ये चंदगड तालुक्यातील जांबरे गावचे सुपुत्र सुनिल शंकर कांबळे यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये पीएचडी संपादन केली. गरीब कुटुंबात जन्म घेतलेला हा मुलगा वयाच्या दहा-बारा वर्षांमध्ये असताना वडील देवाघरी गेले.त्यानंतर त्यांच्या मातोश्रीही सोडून निघून गेल्या.त्यानंतर त्यांचे भाऊ दिलीप शंकर कांबळे यांनी त्यांचे पुढचे शिक्षण शिकायला पूर्णपणे मदत केली.आणि उच्च शिक्षण घेण्याची सतत आवड यामुळे जिद्दीला लागून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.हॉटेलमध्ये काम करत डॉ.सुनील शंकर कांबळे हा प्रवास संघर्षवादी ठरला आणि सुनिलने आपले स्वप्न सत्यात उतरविले.यामध्ये त्यांचे भाऊ दिलीप शंकर कांबळे यांचा खारीचा वाटा आहे.
एकंदरीत यासाठी सुनीलला गाईड म्हणून राजश्री शिवछत्रपती कॉलेज महागावचे माजी प्राचार्य डॉ. निवास जाधव यांचे योगदान लाभले.तसेच रेफरी म्हणून प्रो.डॉ.कैलास ठावरे गोखले इन्स्टिट्यूट पुणे,शिवाजी विद्यापीठ चेअरमन प्रा.डॉ. सुभाष कोंबडे ,विद्यापीठचे HOD डॉ.प्रोफेसर देशमुख,प्रा.डॉ.अमर जाधव,विजय काणकेकर,त्यांचे भाऊ दिलीप कांबळे आणि हॉटेल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment
0 Comments