चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : जंगमहटी(ता.चंदगड)येथील प्रशांत शंकर गावडे(वय 30)या तरुणाने गडहिंग्लज तालुक्यातील वैरागवाडी येथे अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले.यामध्ये तो 96% भाजला असून त्याच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.मंगळवारी रात्री ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी प्रशांत गावडे हा मंगळवारी संध्याकाळी नेसरी येथे आपल्या नातेवाईकासोबत पेट्रोल पंपावर आला. पंपावर त्याने आपल्या वाहनांमध्ये दोनशे रुपयांचे पेट्रोल तर एका कॅनामध्ये तीनशे रुपयाचे पेट्रोल भरले.वैरागवाडी येथे माझे एका साहेबाकडे काम आहे असे सांगून त्यांना वैरागवाडी पर्यंत सोडण्याची विनंती केली.वैरागवाडी येथे आले असता त्यांना 'तुम्ही इथेच थांबा माझे काम आवरून येतो लवकर आलो तर आपण मिळून जाऊया अन्यथा तुम्ही जा'असे सांगितले. बराच वेळ प्रशांतची त्या नातेवाईकाने वाट पाहून शोधाशोध केली.रात्री गल्लीतून मला वाचवा,मला वाचवा असा आवाज ऐकू आल्याने गावातील लोकांनी धाव घेतली असता प्रशांत ज्वाला मध्ये लपेटलेला आढळून आला.लोकांनी आग विझवली विझवली व पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविले.पण प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सीपीआर कडे पाठवण्यात आले.
Post a Comment
0 Comments