Type Here to Get Search Results !

शिनोळी येथे विद्या पाटील यांना वाढता पाठिंबा


चंदगड प्रतिनिधी (रुपेश मऱ्यापगोळ) : कुदनुर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवार विद्या पाटील आणि तुर्केवाडी पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग बेनके यांच्या प्रचार रॅलीला जनतेकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यावेळी विद्या विलास पाटील व पांडुरंग बेनके यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला.


शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रभाकर खांडेकर यांनी कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार विद्या विलास पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.शिनोळी येथे आयोजित सभेदरम्यान प्रभाकर खांडेकर यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत विद्या पाटील यांच्या विजयासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


या प्रसंगी बोलताना प्रभाकर खांडेकर म्हणाले की, कुदनूर परिसराच्या विकासासाठी सक्षम व अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता असून विद्या विलास पाटील हे विकासाभिमुख उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे जनहिताचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या जाहीर पाठिंब्यामुळे कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments