चंदगड/प्रतिनिधी : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी चंदगड तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला आज भेट देत स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.तसेच तालुक्यातील विविध शिष्टमंडळांचे प्रश्न समजावून घेतले. अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या पार्श्वभुमीवर सत्कार किंवा स्वागत समारंभ टाळून मृत्युमुखी पडलेल्या प्रती सहवेदना व्यक्त केली.
यावेळी विविध शिष्टमंडळांनी आणि नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांमध्य़े चंदगड दिवाणी व फौजदारी न्यायालय वकील संघटनेकडून चंदगड दिवाणी न्यायालयाच्या इमारतीसंदर्भात पाठपूरावा करावा अशी मागणी करण्यात आली.त्याचबरोबर बेळगाव- चंदगड- सावतवाडी असा रेल्वेमार्गाचा प्रश्न,बेळगाव ते चंदगड आणि चंदगड ते आंबोली या मार्गावरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे सतेज पाटील यांनी नागरिकांना सांगितले.तसेच तालुक्यातील धनगर वाड्यांमधील लाईट, वनहक्क संदर्भातील अडचणी, वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई या प्रश्नांवर प्रांत, तहसिलदार तसेच इतर महसूल आणि वनअधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून त्याचा पाठपुरावा करण्यासंदर्भात निर्देश दिले.
यावेळी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर,काँग्रेस नेते गोपाळराव पाटील, चंदगड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव देसाई, विक्रम चव्हाण- पाटील, विलास पाटील, एम. जी. पाटील, राजेंद्र परीट, अशोक दानी, तात्यासाहेब देसाई, नारायण आसबे, जयसिंग पाटील, अँड. विठोबा जाधव, अँड. गोविंद दळवी, अँड. संदीप पाटील, अँड. आनंद कांबळे, उदय देसाई, शिवाजी तुपारे, फिरोज मुल्ला, नेत्रदीपक कांबळे, अनुसया दानी, अनिता परीट, पुंडलिक प्रधान, रघुनाथ नाईक, मल्लू गावडे, माधुरी कुंभार यांच्यासह चंदगड काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments