पुणे/प्रतिनिधी : पुणे शहरातील विविध भागांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत,त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.तसेच डासांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून परिणामी डेंगू,मलेरिया असे आजार उद्भवण्याची शक्यता दिसून येत आहे.जागतिक विचार लक्षात घेता विशेषता पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.अशा स्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर धोका निर्माण होत असून संपूर्ण शहरात स्वच्छतेच्या बाबतीतला दर्जा खालावलेला दिसून येत आहे.
महानगरपालिकेने यापूर्वी covid-19 च्या काळात प्रभावी उपयोजना केल्या होत्या त्याच धर्तीवर आज पुन्हा सक्षम ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झालीअसून यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे शहर यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात त्यांनी आपल्या मागण्या नोंदवले आहेत.पूर्वीप्रमाणे मोठ-मोठ्या कचरा संकलन केंद्र शहरातील प्रत्येक प्रभागाच्या महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात यावेत जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा न टाकता त्याचा योग्य निपटारा करतील तसेच महानगरपालिकेने या समस्येवर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत अथवा करणार आहे याची लेखी माहिती पुणे शहर वाहतूक सेना अध्यक्ष सुरज भैय्या खंडाळे यानी निवेदनाद्वारे मागितली आहे.
Post a Comment
0 Comments