Type Here to Get Search Results !

ट्रॅक्टरखाली सापडून विवाहिता जागीच ठार

(चंदगड तालुक्यातील सुरुते येथील घटना,बारावी प्रवेशासाठी दुचाकीवरुन जाताना ट्रॅक्टरची धडक)


चंदगड/प्रतिनिधी : दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यामध्ये टॅक्टरच्या चाकाखाली सापडून ती महिला जागीच ठार झाली. ही दुर्घटना सुरूते (ता. चंदगड) येथील गणपती मंदिराजवळ सोमवारी सकाळी घडली. मधुरा जोतिबा नाईक (वय २३, रा. सुरूते) असे तिचे नाव आहे. याची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी, इयता बारावी वर्गातील प्रवेशासाठी तुडये येथील रामलिंग ज्युनिअर कॉलेजमध्ये मधुरा नाईक गेली होती. घरी परत येत असताना सुरुते येथे तिच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरची जोराची धडक बसली. यामुळे ती खाली कोसळली. तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. घटनेची फिर्याद विठ्ठल नारायण नाईक यांनी चंदगड पोलिसात दिली. त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चंदगड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


४० दिवसात दुसरा अपधात


शिनोळी-तुडये रस्ता अरूंद आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्याची रूंदी वाढविण्याची मागणी करण्यात येऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. २३ एप्रिल रोजी कारच्या धडकेत नागोजी बाळेकुंद्रीकर या यळेबैल येथील व्यक्तीचा सुरूते गावाजवळच अपघाती मृत्यू झाला होता. ४० दिवसानंतर या रस्त्यावर सोमवारी दुसरा अपघात घडला आहे. त्यात महिलेचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments