Type Here to Get Search Results !

ट्रक अपघातात सत्तेवाडी येथील तरुणी ठार.

नेसरी/प्रतिनिधी : सत्तेवाडी ता.चंदगड येथील कला जानबा शिंदे वय 18 वर्षे ही आपले वडील जानबा शिंदे यांच्यासह आपल्या एम एच 09, ई एच 3257 या ॲक्टिव्हा दुचाकीहून गडहिंग्लज वरून येत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शीप्पुर-पोश्रातवाडी फाट्याजवळ काँक्रिट मिक्सर ट्रक नं.एम एच 43,Y0835 या ट्रक वरील चालक महादेव नारायण शिंदे रा. कडगाव याने भरधाव वेगाने ट्रक चालवून शिंदे यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक मारली.या धडकेत दुचाकीवरील कला शिंदे ही ठार झाली.तर वडील जखमी झाले असून त्यांचेवर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


कला शिंदे हीचे बारावी पर्यंत शिक्षण झाले असून ती हुशार विद्यार्थिनी होती.नुकताच तिचा गुणवंत विद्यार्थिनी म्हणून ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला होता.तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून नेसरी ग्रामीण रुग्णालयात तिच्या निधनाचे वृत्त समजताच सत्तेवाडी व माणगाव येथील ग्रामस्थ व नातेवाईक यांनी गर्दी केली होती.सदरची फिर्याद संतोष शिंदे यांनी नेसरी पोलिसात दिली असून.स.पो.नी. आबा गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा.फौजदार शशिकांत पोरे करीत आहेत.कला शिंदे हिच्या पश्यात आई,वडील,भाऊ,विवाहित बहीण असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments