Type Here to Get Search Results !

अभी ग्राफिक्सच्या पाटणे फाटा शाखेचे शानदार उद्घाटन संपन्न.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक अभिजीत गुरबे यांच्या अभी ग्राफिक्स या दुसऱ्या शाखेचा पाटणे फाटा येथे माजी गृहराज्यमंत्री  सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी सतेज पाटील यांनी अल्पावधीत आपल्या व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी मारलेल्या गुरबे कुटुंबियांचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमासाठी युवा नेते निखिल पाटील, गोपाळराव पाटील, भरमु अण्णा पाटील, विलास पाटील, तानाजी गडकरी, प्रभाकर खांडेकर, ॲड.संतोष मळवीकर,अभय देसाई,संभाजीराव देसाई,उद्योजक लक्ष्मण गावडे,नामदेव पाटील, बाबू हळदणकर, अरुण पिळनकर, सुनील काणेकर, अंजनाताई रेडेकर,सुनील शिंत्रे, दिग्विजय कुराडे,खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक एम एम तूपारे,प्रा. आर पी पाटील,भारती जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होते.यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन गुरबे कुटुंबियांनी स्वागत केले.तर सर्वांचे आभार विद्याधर गुरबे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments