मावळत्या सूर्यकिरणांनी होतो गणरायाच्या चरणांचा स्पर्श;भाविकांमध्ये कुतूहल
चंदगड | प्रतिनिधी : हलकर्णी फाटा येथील व्यापारी बांधवांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात गणरायाचा अनोखा किरणोत्सव भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. दररोज सायंकाळी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे गणरायाच्या मूर्तीवर पडत असल्याने हा निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहण्यासाठी भाविकांची उत्सुकता वाढली आहे.
सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सूर्यकिरणे थेट गणेशमूर्तीपर्यंत पोहोचतात. या वेळी गणरायाच्या मूर्तीवर पडणाऱ्या प्रकाशाची मनोहारी छटा पाहायला मिळते. सूर्यकिरणांचा हा अनोखा सोहळा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरातील प्रसिद्ध किरणोत्सवाची आठवण करून देणारा हा नैसर्गिक प्रकाशसोहळा हलकर्णी फाटा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम साधणारा हा क्षण गणेशभक्तांना भावत आहे.
भाविकांनी आवर्जून भेट द्यावी
हलकर्णी फाटा येथील सार्वजनिक गणेशोत्सवात दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हा अनोखा किरणोत्सव पाहण्याची संधी भाविकांना मिळत आहे. गणेशभक्तांनी कुटुंबीयांसह येथे भेट देऊन गणरायाच्या मूर्तीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा हा मनोहारी सोहळा अनुभवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments