चंदगड : प्रा. सरोजिनी दिवेकर ह्या इंग्रजी विषयाच्या अष्टपैलू, हरहुन्नरी व गुणी सहाय्यक प्राध्यापिका होत्या त्यांच्या आकस्मित जाण्याने महाविद्यालयाचे अपरिमित हानी झाल्याचे मत खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक ऍड. प्रा.एन. एस. पाटील यांनी व्यक्त केले.चंदगड येथील र.भा माडखोलकर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.सरोजिनी दिवेकर यांचे अल्पशा आजाराने नुकताच निधन झाले, त्या पार्श्वभूमीवर र.भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील म्हणाले की, प्रा सौ दिवेकर या हुशार व उपक्रमशील, सुसंस्कारित शिक्षिका होत्या, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे इंग्रजी विषयाचे अध्यापन केल्याने महाविद्यालयाचे नाव उंचावल्याचे सांगितले.माजी प्राचार्य डॉ. पी.आर.पाटील म्हणाले की, प्रा सौ दिवेकर ह्या इंग्रजी विषयात निष्णात होत्या, महाविद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा त्यांच्या आकस्मित जाण्याने धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. संचालक इंजि. श्री एम. एम.तुपारे यावेळी बोलताना म्हणाले की, प्रा सौ दिवेकर ह्या विद्यार्थीप्रिय व अष्टपैलू शिक्षिका होत्या त्यांच्या जाण्याने संस्थेचे, महाविद्यालयाचे व विद्यार्थी्याचे नुकसान झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्थेचे जेष्ठ संचालक एल.डी.कांबळे म्हणाले की, सौ दिवेकर ह्या अतिशय नम्र व कर्तव्यदक्ष प्राध्यापिका होत्या त्यांच्या जाण्याने संस्थेचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी प्राचार्य एस व्ही गुरबे म्हणाले की, इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणाऱ्या प्रा. सौ दिवेकर ह्या अष्टपैलू होत्या. त्या कोणत्याही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सहज पार पाडायच्या. यावेळी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ एस डी गोरल यांच्या बोलण्यातून प्रा. दिवेकर यांनी केलेल्या विद्यार्थीनीच्या मानसिक-शरीरात आरोग्याच्या दक्षतेबाबत आणि गरीब गरजू विद्यार्थाना केलेल्या मदतीचा आढावा व्यक्त केला. त्यांच्या व आर्थिक प्रा. ए.डी कांबळे, श्रीनिवास पाटील, डॉ एस एन पाटील, डॉ एन के पाटील, डॉ आर के तेलगोटे, प्रा एम एस दिवटे, आदी सहकाऱ्यांनी प्रा.सौ दिवेकर यांच्या विविध आठवणी सांगून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी समाजातील विविध संस्थाच्या मान्यवरांनी व सहकारी प्राध्यापकांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
Post a Comment
0 Comments