(जुन्या कॉटरची देखभाल दरूस्ती करणे गरजेचे,नवी कोरी इमारत वापराविना बंद)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासनाने व्यवस्था कॉटर्स द्वारे करण्यात आलेलीं आहे. मात्र पोलीस स्टेशन आणि कॉटर्स यामधील अंतर खूप असल्याने शिवाय त्यांच्या फॅमिलीला या ठिकाणी शाळा आणि बाजारपेठ लांब पडत असल्याने कोणीही कर्मचारी कॉटर्समध्ये राहत नसल्याने पोलीस कॉटर्स ओस पडले असून अद्यावत इमारत केवळ वापराविना बंद आहेत. शिवाय याच कॉटर्समध्ये नवीन अपार्टमेंट बांधलेले आहे पण त्याचाही वापर होत नसल्याने या कॉटर्स कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चंदगड पोलीस आपल्या कुटुंबासाठी सोयीच्या दृष्टीने शहरांमध्येच राहतात कारण त्या ठिकाणी शाळा कॉलेज मुलांच्या दृष्टीने जवळ असून अनेक सुविधांची उपलब्ध शहरात असल्याने शहरापासून व पोलीस स्टेशन पासून लांब असणाऱ्या कॉटर्स कडे राहण्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. सद्यस्थितीत पोलीस कॉटर्समध्ये भयान शांतता असून कोणीही कर्मचारी त्या ठिकाणी राहत नसल्याचे तिथल्या वास्तव्यावरून निदर्शनास येत आहे. झाडाझुडपाणी इमारती वेडल्या गेलेले आहेत .शिवाय पोलीस येथे राहतच नसतील तर नवी कोरी कॉटर्स कोणासाठी बांधली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे .सद्यस्थितीत आहे त्या इमारती सुस्थितीत ठेवण्यासाठी त्याची निगा राखणे गरजेचे आहे. नसेल तर या इमारतीचा वापर इतर शासकीय कार्यालया साठी केल्यास इमारती सुस्थितीत राहतील शिवाय शासनाचे लाखो रुपये वाचतील अशा भावना येथून जाताना प्रत्येकाच्या मनात रेंगाळल्याशिवाय राहत नाहीत.
Post a Comment
0 Comments