Type Here to Get Search Results !

जागतिक पर्यावरण दिनानिमित्य कुरणी - बुझवडे हायस्कूल मध्ये वृक्षारोपण.

चंदगड/प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री.शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी - बुझवडे हायस्कूलमध्ये इको क्लबच्या वतीने  वृक्षारोपन करण्यात आले.


झाडे लावा-झाडे जगवा,पर्यावरण रक्षण काळाची गरज म्हणत इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंत इको क्लबचे सदस्य असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी वृक्षारोपन केले.यावेळी वड,पिंपळ,काजू,आंबा आदि वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.मुख्याध्यापक एस.के.हरेर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या वृक्षारोपन कार्यक्रमात एस.के.पाटील,ए.ए.अंबी,टि.बी गावडे आदि शिक्षक वाय बी पाटील लिपीक,रवी गिलबिले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments