चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड येथील प्रसिद्ध असलेल्या अभी ग्राफिक्सच्या दुसऱ्या शाखेचे पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे उद्या शुक्रवार दिनांक १३ रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील,चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील,माजी आमदार राजेश पाटील,माजी रोहयो मंत्री भरमुअण्णा पाटील,दौलत विश्वस्तचे गोपाळराव पाटील,अथर्व ट्रेडर्सचे चेअरमन मानसिंग खोराटे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या फर्मचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमासाठी उद्योजक लक्ष्मण गावडे, विलास पाटील,प्रभाकर खांडेकर, शांताराम बापू पाटील, तालुका संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी, शिवाजी तुपारे, पांडुरंग बेनके यांच्यासह तालुक्यातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावावी असे आवाहन शांताराम गुरबे,चंदगड नगर पंचायतचे नगरसेवक अभिजीत गुरबे,उद्योजक विक्रम गुरबे, गोड साखरचे संचालक विद्याधर गुरबे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments