चंदगड/प्रतिनिधी : बसर्गे तालुका चंदगड येथील परसराम विठोबा ओऊळकर त्यांच्या घराच्या छतावर भला मोठा नाग साप शनिवारी दिसून आला.तर नंतर सर्पमित्र एचडी पाटील यांना संपर्क साधून त्यांचे सर्पमित्र रोहित पाटील यांच्या मदतीने पाटील यांनी अत्यंत धाडसाने झाला मोठा नाग साप पकडून छतावर पोत्यामध्ये घालून त्यांनी जंगलात नेऊन सोडला.
रेस्क्यू करताना एस.डी पाटील
घराच्या भिंतीवर अधून-मधून दिसणारा प्रचंड मोठा नाग साप बऱ्याच दिवसांनंतर आढळून आला.त्यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.त्या रेस्क्यू ऑपरेशन साठी दोन तासाचा कालावधी गेला साप पकडल्यानंतर ग्रामस्थांनी एसडी पाटील व त्यांचे सहकारी रोहित पाटील यांचं आभार मानले.यावेळी बोलताना सर्पमित्र पाटील म्हणाले,एका आठवड्यात विविध ठिकाणाहून आम्ही दहा ते बारा साप रेस्क्यू करून पकडून त्यांना जंगलात सोडला आहोत.या धाडसी कामासाठी बसर्गे ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments