Type Here to Get Search Results !

नेसरी येथे सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकाजवळ हायमास्ट दिव्याचे उद्घघाटन.

 


चंदगड/प्रतिनिधी : नेसरी येथे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक नियोजन मधून हाय मास्ट दिव्यासाठी एकूण ४.४१ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे लोकार्पण राजेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.नेसरी येथील प्रतापराव गुजर स्मारकजवळ आमदार फंडातून अशा प्रकारचा हायमास्ट दिव्यासाठी निधी मंजूर करून तेथील ऐतिहासिक स्थळ तेजोमय केले.त्याबद्दल नेसरी ग्रामस्थानी त्यांचे आभार मानले.


या कार्यक्रमासाठी नेसरी गावच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे,मुन्नासो नाईकवाडी,अभयदादा देसाई, प्रताप पाटील,अमर हेडदुगी,शिवराज देसाई, रणजीत पाटील,संदीप शिंदे, दयानंद नाईक,दिनकर मेटकर,प्रकाश दळवी,किरण हिडदुगि,तसेच नेसरी ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ व भागातील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते


Post a Comment

0 Comments