Type Here to Get Search Results !

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार-रेणुका दीपक कांबळे


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जोर वाढू लागला आहे. अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत येणारा गवसे पंचायत समिती मतदारसंघ यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार म्हणून रेणुका दीपक कांबळे (कोकरे) ह्या पंचायत समिती गवसे गणातुन उभ्या आहेत.त्यांना भागात प्रचार दौरादरम्यान लोकांचा पाठिंबा वाढत आहे.

 


सध्या प्रचारात घरोघरी भेटी देऊन लोकांच्या अडचणी जाणून घेत आपल्या कामाचा जाहिरनामा पोचवत आहेत.आपला भाग मागासलेला असून समाजाच्या कल्याणासाठी मी प्रयन्तशील असेन तसेच येणाऱ्या काळात महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार तर लोकांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार रेणुका दीपक कांबळे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments