चंदगड प्रतिनिधी(रुपेश मऱ्यापगोळ ) : नगरपंचायत चंदगड,आमदार शिवाजी पाटील व जनाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शनिवार दिनांक 31 रोजी रवळनाथ मंदिर येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले असून या शिबिरामध्ये मूत्ररोग, डायलेसिस, बालरोग, अस्थिरोग, खुबा व सांध्याचे प्रत्यारोपण या आजारावरील मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार असून याचा नागरिकांनी लाभ घेण्याची आवाहन चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments