Type Here to Get Search Results !

भरमु अण्णा पाटील यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्य भव्य अभिष्टचिंतन सोहळा

 


चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) :  चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते माजी राज्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ नेते भरमु अण्णा पाटील 90 व्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी स्वराज हॉल मजरे कार्वे येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे असणार आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक  व आमदार शिवाजीराव पाटील हे सत्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 


तसेच या कार्यक्रमासाठी माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळी व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी  उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments