चंदगड : श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा 2026 उमगांव सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री चिरेदेव मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.समर्पण युवा मंच उमगाव यांच्याकडुन दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.गावातील तरुण मुले व ग्रामस्थ यांचा प्रयत्नातून नेहमी समजपयोगी कार्यक्रम राबवून आपली संस्कृती जपण्याचं कार्य या भागातून नेहमी केलं जातं.एकीकडे लोप पावत चाललेली संस्कृती,जगातील महायुद्ध व समस्या,धकाधकीच व वैज्ञानिकरित्या आधुनिक जीवन व त्यात ग्रामीण भागातील लोकांच्या परंपरा या सर्वाना भेदून नवीन पायंडा युवा वर्गातून मनोभावे जपताना पाहायला मिळतोय.
श्री हनुमान जन्मोत्सव,श्री सत्यनारायण महापूजा,लहान मुलांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रम,रवळनाथ हरिपाठ महिला मंडळ सातवणे अश्या पद्धतीने कार्यक्रमा राबविण्यात आले.यावेळी भागातील ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments